ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जठारांची अवस्था अडकित्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी...!

जठारांची अवस्था अडकित्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी...!

प्रकाशन: 08 Feb 2022 12:13 PM
वाचन संख्या 192

जठारांनी जनतेची माफी मागावी..!

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची खरमरीत टीका..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : “सध्या माजी आमदार प्रमोद जठार यांची अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे “, अशी प्रखर टीका माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी सूडबुद्धीने नितेश राणेंवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार सतीश सावंत यांनी घेतला. काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावीत. प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करताहेत. रिफायनरी पूर्ण होण्यासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणेंना खुश करण्याचे प्रयत्न जठार करताहेत. http://localhost/news/public/uploads/2014 च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हैशी जठार विसरलेत. खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर 18 डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कोर्टाला शरण गेले. नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. जर संतोष परबवर हल्ला होऊन त्याला 18 टाके पडल्यावर केंद्रीयमंत्री राणेंनी परबला खरचटले म्हटले होते तसेच नितेश राणेंना ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगु ठरू नये. जरी मी राणेंसोबत होतो तरी बेकायदेशीर कृत्यावेळी मी साथ दिली नाही. गाड्या जाळपोळ, भाजपा तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक सारख्या प्रकरणात मी सोबत नव्हतो, असे माजी जिल्हा बँक सतीश सावंत यांनी सांगितले.

प्रमोद जठार यांनी राणे विरोधात असताना नितेश राणे आणि नारायण राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय ? असा सवाल सावंत यांनी केला. तसे असेल तर आता राणेंची तळी उचलणाऱ्या प्रमोद जठार यांनी जनतेची माफी मागावी, असे आवाहन सावंत यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स