|| सिंधुदिनांक ||
८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१८९९: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)