ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार नितेश राणेंना उपचारासाठी हलवले कोल्हापुरात..!

आमदार नितेश राणेंना उपचारासाठी हलवले कोल्हापुरात..!

प्रकाशन: 07 Feb 2022 01:54 PM
वाचन संख्या 231

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात आणखीन एक घडामोड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात घडली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

१०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून नेण्यात आले आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने ५ रोजी त्यांना कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज अचानक त्यांना कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेत १०८ रुग्णवाहिकेने नेण्यात येत आहे. काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे एक पथक तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, नेमका कोणता आजार आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमांना यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स