ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांद्यात बांदावासिय भव्य शिवस्मारक उभारणारच : शिवसेना बांदा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांद्यात बांदावासिय भव्य शिवस्मारक उभारणारच : शिवसेना बांदा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर

प्रकाशन: 07 Feb 2022 02:25 PM
वाचन संख्या 117

सर्वपक्षीय एकजुटीचीही केली व्यक्त अपेक्षा..!

बांदा | राकेश परब : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांचे भव्य स्मारक बांद्यात व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले. खूप वर्षापासून शिवछत्रपती महाराजांचे स्मारक व्हावे अशी बांद्यातील ग्रामस्थांची इच्छा होती. यासाठीच बांद्यातील सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन एक समिती गठीत करून व माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने शिवछत्रपती महाराजांचे स्मारक होण्यासाठी बांदावासिय प्रयत्न करणार आहेत.
शिवजयंतीपर्यंत स्मारक उभारण्याचा निश्चय केला आहे. खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या महाराज्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा वारसा सांगणाऱ्या तसेच ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बांदा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींच्या सहकार्यासह सर्वांच्या एकजुटीने शिवस्मारकासाठी प्रयत्न करणार असून पुढच्या शिवजयंतीपर्यंत शिवस्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे , असे शिवसेनेचे बांदा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले .
१९ फेब्रुवारीला येथे साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या दिनी शिवस्मारकाच्या संदर्भात बैठक घेतली जाणार असून या बैठकीत स्मारकाच्या कामकाजाबाबतची दिशा ठरविली जाणार आहे . यावेळी समिती गठीत केली जाणार असल्याचे काणेकर यांनी जाहीर केले . यावेळी राजेश विर्नोडकर , रेडी येथील शिवप्रेमी यशवंत गड संघटनेचे निखिल तानावडे , भाऊ वाळके , संदेश पावसकर , शिवतेज सेवा संस्था सिंधुदुर्ग बांदा या संघटनेचे सचिव अनुज बांदेकर , शिवसेना उपतालुका प्रमुख भैय्या गोवेकर आदी उपस्थित होते . काणेकर म्हणाले की , गेल्या काही दिवसांत या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना भेटून बांदा शहराला साजेसे शिवाजी महाराजांचे स्मारक होण्यासाठी शासकीय जमिनीसह शासकीय निधी उपलब्ध व्हावा यासाठी मागणी केली . यास आमदार दिपक केसरकर यांनी पसंती दर्शवली . शासकीय जमिनीत बांदा शहराच्या ऐतिहासिक वारशाला साजेसे शिवस्मारक व्हावे यासाठी सर्वांनी तसेच सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शिवप्रेमींनी एकजुटीने योगदान द्यावे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स