आम.नितेश राणे यांची मुंबई म.न.पा. निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रमुख समितीवर निवड..!
सिंधुदुर्गातील विजयी कामगिरीमुळे पडला प्रभाव..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या आमदार नितेश राणे यांच्यावर मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मुंबई भाजपाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या निवडणुक संचालन समिती वर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार असून, आम.राहुल नार्वेकर आम.कालिदास कोळंबकर,श्री प्रकाश मेहता असे जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांची ही प्रमुख समिती आहे. आमदार नितेश राणे यांची निवडणूक विजयाची रणनीती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुका मधून आजपर्यंत मिळविलेला विजय,आणि शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पार्टीची एकहाती मिळविलेली सत्ता,नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला दिलेली झुंज आणि मिळविलेल्या विजय यामुळे आमदार नितेश राणे यांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी महत्वपूर्ण समितीवर निवड करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)