वेंगुर्ले येथील वैशाली गावडे यांचे निधन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला पाल गोडावणेवाडी येथील वैशाली विजय गावडे (वय वर्षे ६३) यांचे शनिवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुलगी, सुन, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण मधील निवृत्त शिपाई विजय गावडे यांच्या पत्नी तर रिक्षा व्यावसायिक बाळु उर्फ विनोद गावडे यांची आई होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)