ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या श्री. किशोर नाचणोलकर यांची राज्य अध्यक्षपदी नियुक्ती..!

मालवणच्या श्री. किशोर नाचणोलकर यांची राज्य अध्यक्षपदी नियुक्ती..!

प्रकाशन: 05 Feb 2022 04:47 PM
वाचन संख्या 117

रक्तदान क्षेत्रातील सेवाकार्याचा मोठा सन्मान..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :नॅशनल फेडरेशन ऑफ व्हॉलंटरी ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सिंधु रक्तमित्रचे जिल्हा सचिव व मालवणचे सुपुत्र श्री किशोर नाचणोलकर यांची नियुक्ती केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई पुणे कोल्हापूर बेळगांव, गोवा राज्य तसेच वेळप्रसंगी अन्य जिल्ह्यातील मित्र सदस्यांच्या मदतीने ‘रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र’ चळवळीत मोलाचे योगदान देणारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही जिल्हावासीयांची नोंदणीकृत संस्था आहे.
आता पर्यंत संस्थेने अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध करुन दिले आहे. अनेक रक्तदान शिबिरे आयोजीत केली आहेत, प्रत्येक महिन्यात ८ ते १० शिबिरे हे लक्ष ठेऊन संस्था काम करत आहे. अवयवदान देहदान या संदर्भानेही संस्था जनजागृती करत आहे. या जागृतीला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.
या सर्व कार्याची दखल नॅशनल फेडरेशन ऑफ व्हॉलंटरी ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेने घेतली आहे. या संस्थेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानशी संपर्क साधून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती घेतली व या माहितीने प्रभावित होऊन संस्थेला महाराष्ट्र राज्यातुन पहिले सदस्य करुन घेतले. अनेक राज्यांतील ऐच्छीक रक्तदान संस्थाना सदस्य करुन घेत असताना महाराष्ट्रातुन हा बहुमान सिंधु रक्तमित्रला मिळाला आहे. फेडरेशनने सदस्यत्व देत असतानाच महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी सिंधु रक्तमित्रचे जिल्हा सचिव श्री किशोर नाचणोलकर यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यातील रक्तदान चळवळीतील संस्थाची सदस्य म्हणुन निवड करुन महाराष्ट्र राज्याची कार्यकारीणी तयार करण्याची जबाबदारीही नॅशनल फेडरेशन ऑफ व्हॉलंटरी ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन (इंडिया)चे अध्यक्ष मा.श्री.भुपेंद्र देव (गुजरात) यांनी किशोर नाचणोलकर यांच्यावर सोपवली आहे.

सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणारे आणि स्पष्टवक्ते अशी छबी असलेल्या किशोर नाचणोलकर यांच्या सेवाकार्याची उचित् दखल घेतली गेल्याने रक्तमित्र वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला मिळालेला हा फार मोठा बहुमान आहे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेचे तसेच फेडरेशनच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोर नाचणोलकर यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स