ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या नूतन मुख्याध्यापकांचे स्वागत.

बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या नूतन मुख्याध्यापकांचे स्वागत.

प्रकाशन: 05 Feb 2022 07:14 PM
वाचन संख्या 41

बांदा | राकेश परब : शाळा व्यवस्थापन समितीने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक देण्यात आले आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापकपदी श्रीकांत विठ्ठल आजगांवकर हे शाळेत रूजू झाले आहेत. यापूर्वी उपशिक्षिका सरोज नाईक या प्रभारी मुख्याध्यापक पद सांभाळत होत्या.
जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्येची शाळा म्हणून ख्याती असलेल्या बांदा केंद्रशाळेत गेली दोन वर्षे मुख्याध्यापक पद रिक्त होते. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून सरोज नाईक गेली दोन वर्ष पदभार सांभाळत होत्या. कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने याचा परिणाम अध्यापनावर होत होता. पटसंख्या वाढल्याने प्रत्येक इयत्ताचे दोन वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचे समायोजन करताना अडचणीचे ठरत होते. केंद्रशाळेची शैक्षणिक प्रगती ही वाखाणण्याजोगी असून शाळेने लोकसहभागातून तब्बल सात लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळण्यासाठी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
नूतन मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर हे शाळेत रूजू झाल्यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश तळवणेकर व शिक्षक यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आजगांवकर यांनी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा नावलौकीक वाढवुया असे सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स