ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अखंड श्रमिक मुक्तीवेध तर्फे "निर्धार मेळाव्याचे" १६ ऑगस्ट रोजी आयोजन
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अखंड श्रमिक मुक्तीवेध तर्फे "निर्धार मेळाव्याचे" १६ ऑगस्ट रोजी आयोजन

प्रकाशन: 14 Aug 2021 01:36 PM
वाचन संख्या 50

जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन


कणकवली / उमेश परब : अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोमवार १६ ऑगस्ट रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिसेकामते येथील शैला कदम यांच्या निवसासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. अशी माहिती अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात व्यसनमुक्त समाज, हक्काचं घर, शिक्षण, संविधानिक मानवी अधिकार, सामाजिक समता या पंचसूत्रीचा निर्धार केला जाणार आहे. कातकरी विद्यार्थी आणि व्यसनमुक्त झालेल्या कातकरी बांधवांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी निर्धार शपथ घेतानाच कातकरी बांधवांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात कातकरी बांधवांची गीते सादर केली जाणार आहेत. मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी अंधश्रद्धा जागृतीही केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स