ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नितेश राणें म्हणजे कोकणाच्या राजकारणातील दाऊद इब्राहिम -संदेश पारकर…

नितेश राणें म्हणजे कोकणाच्या राजकारणातील दाऊद इब्राहिम -संदेश पारकर…

प्रकाशन: 14 Aug 2021 12:29 PM
वाचन संख्या 78

हॉटेल व्यवसायिक हितेश केसवणी १० लाखांची खंडणी प्रकरण जनतेला माहीत..

कणकवली / उमेश परब : नितेश राणे आमदार आहेत, तरीही खंडणी व्यवसाय असल्यानेच बोलरोमधून काळ्या कपड्यातील गुंड घेऊन फिरतात.आहे.मुंबईत हॉटेल व्यवसायिक हितेश केसवणी १० लाखांची खंडणी प्रकरण जनतेला माहीत आहे.आ.नितेश राणे कोकणातील राजकारणातील कुविख्यात गुंड दाऊद आहेत.राणेंनी मच्छिमारी संस्था केली होती.त्यावेळी पैसे गोळा करण्याचे काम करत राणेंचे लोक करत होते.ज्यावेळी पारंपरिक व पर्ससीन वाद झालेत,तेव्हा राणेंनी पर्ससीनवाल्यांचे समर्थन केले होते.त्यावेळी पारंपरिक मच्छिमारांचे नेतृत्व आ.वैभव नाईक यांनी केले.मात्र किरण सामंत यांच्यावर टीका करणारे नितेश राणे हे कोकणातील राजकारणातील दाऊद इब्राहिम असल्याचा आरोप शिवसेना नेता संदेश पारकर यांनी केला.

कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,नगरसेवक सुशांत नाईक,हर्षद गावडे,रिमेश चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना आ.वैभव नाईक पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी सभागृहात आवाज उठवला आहे.मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडा फेकून मारण्याचा प्रकार केला. पारंपरिक मच्छिमारांना राणेंनी जन्माची अद्दल घडवली आहे.त्यावेळी आता पारंपरिक मच्छिमारांची भाळावल करणारे नितेश राणे हे दिशाभूल करणारे आहे.आता पारंपरिक मच्छिमाऱ्यांवर प्रेम आलं ते पुतण्या मावशीचे असल्याची टीका संदेश पारकर यांनी केली.

राज्यात आणि जिल्ह्यात आ.नितेश राणे यांचे कृत्य अनेक आहेत.कणकवलीत वकिलाची गाडी जाळली,नगरसेविका गाडी झाली,सावंतवाडी नगराध्यक्ष परब यांची गाडी जाळली आहे.गोवा चेक नाका कोणी फोडला,महामार्ग अधिकारी शेडेकर यांच्यावर चिखल कोणी फेकला.त्यामुळे दाऊद जसा कुविख्यात कृत्यासाठी प्रसिद्ध आहे.तसेच राज्यातील अनेक खंडणी प्रकरणात व वाईट कृत्यासाठी नितेश राणे प्रसिद्ध आहे.खडणी वसूल करणं हे राणेंचा पीडिजात व्यवसाय आहे. त्यांचा वारसा नितेश राणे प्रसिद्ध असल्याचा टोला संदेश पारकर यांनी केला आहे.

मुबंई येथील हॉटेल व्यावसायिक हितेश केसवणी यांच्या तक्रार मुबंई पोलिसांत केली.१० लाख खंडणी मागितली होती. खंडणी व्यवसाय असल्याने त्यांना गाड्या घेऊन फिरावे लागते आहे.किरण सामंत यांचा ठेकेदारी पीडिजात व्यवसाय आहे.त्यांनी खंडणी केली.शिवसेना एकसंघ आहे,राणेंचा तीन पराभव झाले आहेत.त्यामुळे या शिवसैनिक अंगार आहे,या विषाची परीक्षा घेऊ नये.बाळासाहेब यांच्या विचारांवर काम करत आहेत.त्यामुळे पुढील काळात उरले सुरले राणेंचे राजकिय अस्तित्व संपवले जाईल,असा इशारा संदेश पारकर यांनी केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स