ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार भाई गिरकर यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परबचा सत्कार..!

आमदार भाई गिरकर यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परबचा सत्कार..!

प्रकाशन: 02 Feb 2022 05:50 PM
वाचन संख्या 198

सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या आहे हिमानी परब..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शारिरीक तथा मानसीकदृष्ट्या अतिशय खडतर अशा मल्लखांब क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त, सिंधू कन्या हिमानी परब हिचा कांदिवली मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिंधुदुर्गचे सुपुत्र आदरणीय भाई गिरकर यांनी नागरी सत्कार केला.
हिमानी परब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रमाणे कोकणातील इतर विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्तुंग यश संपादीत करावे व कोकणाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पुढे न्यावे असे  असे मत हिमानी परब च्या सत्कार प्रसंगी आमदार भाई गिरकर यांनी मुंबई कांदिवली येथे बोलताना व्यक्त केले. आमदार भाई गिरकर हे सिंधुदुर्ग मधील सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभे असतात. मलखांब या खेळाला सुद्धा जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी आमदार भाई गिरकर यांचे योगदान मोठे आहे. हिमानी परब हिने सत्कारास उत्तर देताना सांगितले गिरकर साहेब आणि भाजपच्या वतीने आज जो माझा सत्कार झाला हा मला कायम स्मरणात राहील. यावेळी संजय बाविस्कर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स