ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देशातील आघाडीची रोलर स्केटींग चॅम्पियन व मसुरे चांदेर गावची कन्या रीना बाबा परब हिचा मुंबई येथे सत्कार..!

देशातील आघाडीची रोलर स्केटींग चॅम्पियन व मसुरे चांदेर गावची कन्या रीना बाबा परब हिचा मुंबई येथे सत्कार..!

प्रकाशन: 02 Feb 2022 03:55 PM
वाचन संख्या 295

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे चांदेर गावची कन्या आणि आणि सध्या मुंबई कुर्ला बैल बाजार वाडिया इस्टेट येथील राहणारी रीना बाबा परब हिने मोहाली पंजाब येथे संपन्न झालेल्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप http://localhost/news/public/uploads/2021 स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून इंटरनॅशनल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या घवघवीत यशाबद्दल मुंबई कलीना येथे शिवसेनेचे आमदार श्री संजय पोतनीस आणि शिवसेना कालिना विभाग यांच्या वतीने रीना परब हिचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार संजय पोतनीस म्हणाले की रीना बाबा परब ही स्केटिंग मधील एक देशातील रत्न आहे. भविष्यातही अशा सर्व खेळाडूंच्या मागे ते आणि शिवसेना खंबीरपणे उभे राहतील. रीना परब आणि इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू आणि तिच्या प्रशिक्षकांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबई येथील शिवसेना शाखा क्रमांक 166 चे शाखाप्रमुख राजन खैरनार , राष्ट्रपती पदक पोलीस विजेते किशोर शेलार उर्फ मामा, श्री बाबा परब,योहानन फर्नांडिस, परम वडोर,सोहम मोरे, इंटरनॅशनल रोलर स्केटिंग प्रशिक्षक राहुल पदिरकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते स्केटिंग मध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या योहानन फर्नांडिस- सुवर्ण, परम वडोर-रौप्य,सोहम मोरे-रौप्य पदक आणि प्रशिक्षक राहुल पदिरकर यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रीना परब आणि तिच्या सर्व सहकारी खेळाडूंचे कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडुंना प्रोत्साहन देऊन पुढे आणण्यासाठी शाखाप्रमुख राजन खैरनार यांचा नेहमीच मोठा वाटा असतो. रीना परबच्या एकंदर यशाबद्दल तिच्या मूळ गांवी चांदेर,मसुरे येथे उत्साहाचे व कौतुकाचे वातावरण आहे.

    

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स