नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण
नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : संतोष परब हल्ला प्रकरणी आम. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते घरी निघाले असताना पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दहा दिवसांच्या दिलाशामुळे पोलिसांना नितेश राणे यांना अटक करता आले नाही. मात्र नितेश राणे यांनी आपल्या वकिलांशी केलेल्या प्रदीर्घ सल्लामसलतीनंतर आज कणकवली दिवाणी न्यायालयात शरण होण्याचा निर्णय घेतला.
काही वेळापूर्वीच आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. न्यायालयात हजर झालेल्या आमदार नितेश राणे यांचा ताबा पोलीसांकडे देणार की नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येणार, याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)