शिरगांव येथील ओम गणेश मंदिरात ३ फेब्रुवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव सोहळ्याचा आरंभ..
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव-बाजारपेठ येथील ओम गणेश मंदिरात गुरू.३ आणि शुक्र.४ फेब्रु. रोजी माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे.
गुरू.३ फेब्रु.रोजी.स.८,३० वा. सहस्र दुर्वा अर्पण,१० वा. तिर्थप्रासाद,दु. ३ ते ५ या वेळेत स्थानिक भजने,सायं.७ ते १० वा. कीर्तनकार हरिहर नातू यांचा कीर्तन सोहळा, शुक्र.४ फेब्रु. ला स.७ वा. श्री गणेश पूजा व एकादशमी,९ वा. महाआरती, तिर्थप्रसाद ,९ :३० वा. वैयक्तिक अभिषेक, १२ वा. श्री चा दर्शन सोहळा,सायं.४ ते ६,३० वा. स्थानिक भजने, ७ ते १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सोहळ्याला सर्व भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घ्यावे असे आवाहन अध्यक्ष श्री. हेमंत देसाई, उपाध्यक्ष अंकुश मेस्त्री,कार्याध्यक्ष संदीप साटम,खजिनदार विजय कदम, सचिव नागेश पवार यांनी केले आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)