विश्व हिंदु परिषद प्रखंड ,वेंगुर्लेच्या वतीने दिव्यांगासाठी पांढरी काठी व आरोग्य सेवकांना ऑक्सीमीटरचे वाटप.
चिंदर | विवेक परब : विश्व हिंदु परिषद प्रखंड ,वेंगुर्लेच्यावतीने साईदरबार हाॅल मध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अंधांना पांढरी काठी व तालुक्यातील आरोग्य सेवकांना ऑक्सीमीटरचे वाटप मुंबईस्थीत डाॅ. दिलीप पवार व विश्व हिंदु परिषदेचे प्रांताचे सेवा प्रमुख डाॅ राजन शिरसाठ यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण, भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई, डाॅ. माधुरी शिरसाठ, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा महामंत्री गिरीष पाठक, प्रखंड प्रमुख अरुण गोगटे, प्रखंड महामंत्री आपा धोंड, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, वसंत तांडेल, डाॅ. नामदेव मोरे, डाॅ. वसुधा मोरे, डाॅ. दर्शेश पेठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदानंद पावले , सुरेश दामले, यशवंत सातार्डेकर, गुरुनाथ सामंत, विजय कदम या अंधांना पांढर्या काठीचे वाटप करण्यात आले. तसेच भाजपा दिंव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या कडे १५ काठ्या देण्यात आल्या.
यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली, भोगवे, कर्ली, होडावडा, उभादांडा – १ , उभादांडा – २ , मातोंड, केरवाडा, शिरोडा, आरवली, आडेली प्रा.आरोग्य केंद्र, परुळे प्रा.आरोग्य केंद्र, टी.एच.ओ.वेंगुर्ला इत्यादी आरोग्य सेवकांना ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदु परिषदेचे महेश वेंगुर्लेकर, राघवेंद्र जोशी, राऊळ, महेश सावळ, गरगटे, दुर्गा शिरोडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृणाल वरसकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)