अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ठाणे शहरातील नूतन कार्यालयाचे गडकरी रंगायतन येथे उद्घाटन.
चिंदर | विवेक परब : ठाणे येथे नाट्यपरिषदेचे कार्यालय व्हावे अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती, या मागणीला मान देऊन शहराचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन मध्येच या कार्यालयासाठी जागा देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले. या संस्थेच्या उपक्रमामधून ठाणे शहरात उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ घडावेत अशी अपेक्षा यासमयी बोलताना व्यक्त केली गेली. गडकरी रंगायतन नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी जाहीर केले.
यावेळी खासदार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, अभिनेते शरद पोंक्षे, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेते व दिग्दर्शक मंगेश कदम, विद्याधर ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)