ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वसा वारीचा हा घेतला पावलांनी....! (विशेषवृत्त)

वसा वारीचा हा घेतला पावलांनी....! (विशेषवृत्त)

प्रकाशन: 31 Jan 2022 12:40 PM
वाचन संख्या 221

शिरगांव वारकरी संप्रदायाच्या माघ महिन्यांतील समता पायीदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..!

शिरगांव | संतोष साळसकर (विशेषवृत्त):
“वसा वारीचा हा घेतला पावलांनी…”, अशा व्रतस्थ आस्थेने ,”हरी मुखे म्हणा..हरी मुखे म्हणा..पुण्याची गणना कोण करी…बोला पुंडलिक वरदे ..हरी विठ्ठल” जयघोषात.. टाळमृदुंगाच्या गजरात.. विठ्ठल  नामाचा अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी संप्रदायाची माघ महिन्यातील समता पायी दिंडीने शनिवार दिनांक २९ जानेवारीला शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले.


या पायी वारीचा शुभारंभ ग्रामदैवत श्री पावणाई देवालयात प्रथम श्रीफळ व विनंती ठेऊन करण्यात आला.शिरगांव बाजारपेठेत सर्व वारकर्यांनी रिंगण करून टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचे अभंग गायनातून समरसले .
यावेळी सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. त्यानंतर ओम गणेश मंदिरात आरती केली गेली. यावेळी ओम गणेश मंडळाचे विश्वस्त ,पदाधिकारी उपस्थित होते.तेथून राक्षसघाटी येथे श्री. राजू परब यांच्या निवासस्थानी अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आली होती. हडपीड येथील श्री गणेश मंदिर,श्री स्वामी समर्थ मठ,श्री दत्त मंदिर,कोळोशी येथील श्री विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी आरती करण्यात आली.नांदगांव येथील प्रमोद लोके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.शिरगांव येथून निघालेली पायी दिंडी कणकवली तालुक्यातील लोरे नं १ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघ वारी समता पायी दिंडीमध्ये सहभागी होणार आहे.यावेळी या पायी दिंडीचे प्रमुख ह.भ.प.सर्वोत्तम साटम महाराज यांनी जगावर असलेले कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा एकदा सर्वांना आनंदी दिवस बघता यावेत असे पांडुरंगाला साकडे घालणार असल्याचे सांगितले.
आता पायी दिंडीच्या वारकर्यांची आस आहे ती चंद्रभागेच्या तीरावरील मंदिरात विटेवर उभ्या असलेल्या विठू माऊली मंदिराच्या कळसाची आणि मुख दर्शनाची..!

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स