ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
रेवंडी गावात ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रेवंडी गावात ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

प्रकाशन: 30 Jan 2022 02:27 PM
वाचन संख्या 76

वाचन, लेखन व अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने रेवंडी येथील श्री भद्रकाली ग्रंथालयामध्ये काही निवडक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, लेखन व मराठी गीतगायन स्पर्धाही घेण्यात आली तसेच गावातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष युवराज कांबळी, जयराम कांबळी, अरविंद कांबळी, नरेश करलकर, रेवंडी सरपंच प्रिया कांबळी, रवींद्र कांबळी, प्रथमेश करलकर, केळुसकर, मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच प्रिया कांबळी यांनी मराठी भाषेचे महत्व विशद करताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे, असे सांगितले. तर विजय कांबळी यांनीही मराठी भाषेवर मनोगत व्यक्त केले.
यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये वाचन स्पर्धा- प्रथम क्रमांक – दीप किशोर कांबळी, द्वितीय क्रमांक – शौर्या मनोज कांबळी. लेखन स्पर्धा- प्रथम क्रमांक – शौर्या मनोज कांबळी, द्वितीय क्रमांक – दीप किशोर कांबळी. अंताक्षरी स्पर्धा प्रथम क्रमांक – गौरी अभिजित केणी, द्वितीय क्रमांक – कृतिका किशोर कांबळी यांनी यश मिळविले. या विजेत्यांना ग्रंथपाल सुषमा मयेकर, माजी सभापती सोनाली कोदे, रेवंडी पोलीस पाटील मनोदया कांबळी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विजय कांबळी याने केले. कोरोना विषयक नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स