ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चाफेड-भोगलेवाडी येथील गायगोठण गणपती मंदिरातील माघीगणेश जयंती उत्सव ४ फेब्रुवारी रोजी.

चाफेड-भोगलेवाडी येथील गायगोठण गणपती मंदिरातील माघीगणेश जयंती उत्सव ४ फेब्रुवारी रोजी.

प्रकाशन: 30 Jan 2022 01:46 PM
वाचन संख्या 143

शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील जागृत श्री गायगोठण गणपती मंदिरात शुक्र.दि.४ फेब्रु.रोजी माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा उत्सव कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.


यादिवशी स.९ ते १२ वा. विविध धार्मिक विधी,मंत्र पुष्पांजली,दु.१२ ते ३ वा. महाप्रसाद, ३ ते ५ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा,सायं.५ ते ७ वा. तिर्थप्रासाद, ७ ते १० वा. पंचक्रोशीतील नामांकित भजने, रात्री १० ते ११ वा. कणकवली येथील सिंधुगर्जना ढोलपथक, १२ नंतर सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहे.पहाटे ५.३० ते ६ वा. काकड आरती. आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या उत्सवाच्या आदल्या दिवशी ३ फेब्रु.रोजी सायं.३,३० ते ६ वा. हळदीकुंकू. आयोजित करण्यात आले आहे.तरी या उत्सवाला भाविकांनी शासनाच्या नियमाप्रमाने कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घ्यावे.असे आवाहन गायगोठण गणपती मंडळ देवस्थान चे अध्यक्ष-पंढरीनाथ कांडर,उपाध्यक्ष- महेश भोगले,खजिनदार- सत्यवान कांडर,सरचिटणीस-सत्यवान भोगले आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स