ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन  रहाणार ऑनलाईन पद्धतीने  व्यापारी एकता मेळाव्यास रहाणार उपस्थित..!

सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन रहाणार ऑनलाईन पद्धतीने व्यापारी एकता मेळाव्यास रहाणार उपस्थित..!

प्रकाशन: 30 Jan 2022 01:24 PM
वाचन संख्या 38

व्यापारी एकता मेळाव्याला जाहीर पाठिंबा…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित ३१ जानेवारी रोजीच्या व्यापारी एकता मेळाव्यास सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनने
जाहीर पाठींबा दिला आहे.
व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून सिंधुदुर्ग मधील सर्व व्यापारी बंधूना एकत्रित ठेवण्याचे चांगले काम ही संघटना करीत आहे. सिंधुदुर्ग डीलर्स असोसिएशनचा स्थानिक व्यापारी बंधूच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या सर्व संघटनाना कायमच पाठिंबा असतो. परंतु मेळाव्या दिवशी व्यवसाय बंद ठेऊन सहभागी व्हा या आवाहनाला सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचा विरोध राहणार आहे. दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आमच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बहुतांश व्यापाऱ्यांचे फारच आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय बंद ठेवणे हे अयोग्य वाटते. तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पद्धतीने असल्याने व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य पुरवणारी आमची सर्व दुकाने सुरु राहुन ऑनलाईन लिंक वर जॉईन होऊन आमचे सर्व व्यापारी आपली बहुमूल्य उपस्थिती सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास दर्शवतील अशी माहिती सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन राणे यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स