ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विजेचा शॉक लागून शेतकरी किरकोळ जखमी तर दोन गाईंचा मृत्यू….

विजेचा शॉक लागून शेतकरी किरकोळ जखमी तर दोन गाईंचा मृत्यू….

प्रकाशन: 13 Aug 2021 04:33 PM
वाचन संख्या 90

शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, संतोस कानडे

कणकवली | प्रतिनिधी : विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्युमुखी पडल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना कणकवली येथे आज घडली. यात मोठ्या प्रमाणावर संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान झालेला प्रकार लक्षात घेता संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.
कणकवलीतील पियाळ येथील शेतकरी विश्वनाथ विश्राम कदम हे सकाळी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरावयास घेऊन गेले असताना पियाळ प्राथमिक शाळेच्या माळावर गुरे चरत असताना विद्युतभारीत वाहिन्यांमध्ये अडकून २ गायी मयत झाल्या. तसेच त्या तारांमध्ये एक बैल अडकला होता पण त्याला सोडवण्यास विश्वनाथ कदम यांना यश आले. त्याचवेळी कदम यांना विजेचा धक्का लागून ते दूर फेकले गेले, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती व भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स