ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईस: श्री अविनाश सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईस: श्री अविनाश सामंत

प्रकाशन: 13 Aug 2021 06:27 PM
वाचन संख्या 91

मालवण । प्रतिनिधी : पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित नसून यात अनेक घटक समाविष्ट असल्याने पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष श्री. अविनाश सामंत यांनी कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला आहे त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न राहतील असे श्री. सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मालवण धुरीवाडा येथील हॉटेल सायबा येथे पार पडली. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष डी. के. सावंत, खजिनदार नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत, मंगेश जावकर, मिलिंद झाड, जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड, दादा वेंगुर्लेकर, डॉमनिक ब्रिटो, मिलिंद परुळेकर, तुळशीदास कोयंडे, गणेश पाडगावकर, समिधा मांजरेकर, सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत, उदय गावकर, गुरुनाथ राणे, भालचंद्र राऊत, कन्हैया तांडेल आदी उपस्थित होते. या बैठकीची माहिती श्री सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पर्यटन व्यवसायात हॉटेल व्यावसायिकांबरोबरच वाहतूक व्यावसायिक, सहकार क्षेत्र, व्यापारी, ग्रामीण भागातील पर्यटन व्यावसायिक आदी समावेश होतो. या सर्वांना एकत्र आणून पर्यटनाशी जोडण्याचा प्रयत्न विविध आघाड्या स्थापन करून करण्यात येणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या प्रत्येक तालुका निहाय व पर्यटन गाव निहाय आघाड्या स्थापन करण्यात येऊन त्यांच्या कार्यकारिणी देखील लवकरच नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगून श्री सामंत यांनी गेले दीड वर्ष कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे सर्वच पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यवसायिकांची एकत्रित मोट बांधून पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स