ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव.

महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव.

प्रकाशन: 01 Aug 2021 07:36 PM
वाचन संख्या 75

मसुरे | प्रतिनिधी : पत्रकार उत्कर्ष समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या कणकवली तालुक्यातील स्पर्धक कु.धैर्या बांदेकर,श्रद्धा पाटकर यांना महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याचबरोबर रेडिओच्या नागपूर आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी जि.प.पू.प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.ईश्वरी किशोर दळवी व स्वयंसेवक कु.श्रद्धा सतिश पाटकर यांची निवड करण्यात आली होती.त्यांच्या मुलाखतीचे प्रसारण १३ जुलै रोजी करण्यात आले.त्यांच्या या कार्याचे कौतुक तसेच त्यांना प्रेरणा देण्यासाठी महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हाध्यक्षा सौ.ज्योतिका हरयाण म्हणाल्या, महिला उत्कर्ष समिती हे महिलावर्गासाठी तयार केलेलं व्यासपीठ आहे.समाजातील सर्व महिलांना पाठबळ देण्याचं काम आम्ही करत आहोत
त्याचबरोबर आपल्यामध्ये काय कमी आहे ते न पहाता आपल्यात काय चांगले आहे ते पहावे आणि मार्गक्रमण करावे.  सत्कारमूर्तींना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सचिव सुप्रिया पाटील, श्रद्धा पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले.  सदस्या दुर्वा मानकर, स्वरदा खांडेकर, सविता चव्हाण, पूजा बांदेकर उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स