ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देवगडच्या सुपुत्राला 'राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक' जाहीर!

देवगडच्या सुपुत्राला 'राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक' जाहीर!

प्रकाशन: 28 Jan 2022 09:41 PM
वाचन संख्या 50

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मीठबांवचे सुपुत्र व मुंबई अग्निशमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संजय यशवंत मांजरेकर यांना अग्निशमन दलातील उत्कृष्ट सेवे बद्दल ‘राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक’ जाहीर झाले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सदर पदक देऊन लवकरच त्यांना गौरविण्यात येणार आहे. मिठबाव उत्कटवाडी येथील संजय मांजरेकर यांनी १९८९ मध्ये मुंबई अग्निशमन दलात सहा. केंद्र अधिकारी म्हणून भायखळा येथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला होता. त्यानंतर विक्रोळी, भेंडीबाजार येथील केंद्रावर सेवा बजावत सध्या ते नाना चौक येथील अग्निशमन केंद्रावर डेप्युटी चीफ फायर ऑफिसर या पदावर कार्य करत आहेत. येत्या एप्रिल मध्ये सेवेची ३३ वर्ष पूर्ण करणाऱ्या मांजरेकर यांनी सेवाकालावधीमध्ये अनेक वेळा प्रशंसनीय काम केले आहे. ९१ सालची मुंबई दंगल, साखळी बाँब स्फोट, भेंडी बाजार इमारत दुर्घटना अशा मोठ्या प्रसंगात केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांना कमिशनर यानी रजत पदक देऊन सन्मानित केले होते. संजय मांजरेकर यांची उत्कृष्ट कार्यामुळे ‘राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदका’ साठी घोषणा झाल्याने सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स