ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
गीतगायनातून जागवला देशप्रेमाचा जागर..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गीतगायनातून जागवला देशप्रेमाचा जागर..!

प्रकाशन: 28 Jan 2022 05:52 AM
वाचन संख्या 91

नेहरु युवा केंद्र मार्फत देशभक्तीपर गीतगायन आणि वेशभूषा स्पर्धा संपन्न…

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील ‘प्रज्ञांगण’ संस्थेच्या सभागृहात नेहरू युवा केंद्र तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन आणि वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थीगटाने पटकावला. द्वितीय क्रमांक सोमलेवाडी ग्रुप यांना मिळाला तर तृतीय क्रमांक संकेत जाधव आणि संकल्प चौकेकर यांना विभागून मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिस समीर तांबे आणि ग्रुप यांना देण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक नीरज रमेश पवार याने पटकावला. व्दितीय क्रमांक परेश विलास कांडर याने तर तृतीय क्रमांक समीक्षा विलास मांजरेकर आणि नमिता संतोष घाडिगांवकर यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक अर्चना हिवाळकर हिला मिळाले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. गीतगायन स्पर्धेचे परीक्षण सौ.विश्रांती कोयंडे यांनी तर वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण सौ. श्रावणी मदभावे यांनी केले.
यावेळी नेहरू युवा केंद्राच्या कणकवली तालुका समन्वयक वर्षा केसरकर, अक्षय मोडक, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव आणि रीना दुदवडकर, प्रथमेश पौळ उपस्थित होते. तसेच तळेरेचे माजी उपसरपंच दीपक नांदलस्कर, विद्यमान उपसरपंच दिनेश मुद्रस, स्व. सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, राजू वळंजू, निलेश तळेकर, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड, अंकित घाडी, ओम वाड्ये, रश्मी साटम, संचिता पावसकर, शबरी पावसकर, प्रज्ञांगण परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केसरकर, प्रास्ताविक सुजय जाधव यांनी केले तर रीना दुदवडकर यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स