वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारी प्रचारार्थ गोव्यातील मांद्रे येथे ...!
चिंदर | विवेक परब : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत मांद्रे विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारी हरमल गावात उमेदवारांसमवेत दाखल झाले. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभू , तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस हे उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)