ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात जिज्ञासा फाऊंडेशन,चिवला बिच वाॅटरस्पोर्टस् व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांचा स्वच्छता उपक्रम..!

मालवणात जिज्ञासा फाऊंडेशन,चिवला बिच वाॅटरस्पोर्टस् व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांचा स्वच्छता उपक्रम..!

प्रकाशन: 26 Jan 2022 12:52 PM
वाचन संख्या 269

मालवण | नझ़िरा शेख़ : 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिज्ञासा फौंडेशन मालवण यांच्या वतीने चिवला बीच येथे स्वछता मोहिमेचे आयोजन केले गेले.पर्यावरण व स्वच्छता प्रेमींनी सकाळी ७ वाजता चिवला बीच येथील सिल्व्हर सॅन्ड हॉटेल शेजारी जमून या अभियानाची सुरवात केली.
या उपक्रमात जिज्ञासा फाऊंडेशनसोबतच चिवला बिच येथील व्यावसायिक,वाॅटरस्पोर्टस् व स्कूबा डायव्हिंग व्यावसायिक यांचा लक्षणीय सहभाग होता.तसेच युथ बिटस् फाॅर क्लायमेट चेंज या संस्थेने देखील यात अभ्यासपूर्ण सहभाग घेतला. सहभागी स्वयंसेवकांनी अतिशय मनोभावे चिवला बिच किनारा स्वच्छतेचा उपक्रम राबवल्याने मालवण परिसरांत जिज्ञासा फाऊंडेशन व चिवला बिच वाॅटरस्पोर्टस् व स्कूबा डायव्हिंग व्यावसायिक मंडळींची प्रशंसा करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स