ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा…!

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा…!

प्रकाशन: 26 Jan 2022 11:56 AM
वाचन संख्या 62

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण शहरातील सुप्रसिद्ध रोझ़री इंग्लिश स्कूल या प्रशालेत भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आरोग्याचे सर्व नियम पाळून साजर्या केलेल्या या कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ओळख सहशिक्षिका ज्योती रेवंडकर यांनी करुन दिली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका श्रीमती पेरपेदीन मॅक्सी फर्नांडिस उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


कार्यक्रमात शिक्षकांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. शिक्षकवृंदातर्फे सहशिक्षिका सौ.स्वाती हळदणकर यांनी भाषण केले.


तर प्रशालेचा विद्यार्थी कु.ओम मसुरकर याने भाषण केले.
या प्रसंगी शाळेचा शिक्षकगण ,विद्यार्थीवर्ग उपस्थिती होता. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिस्टर मोनिका यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला फातिमा काॅन्व्हेंटच्या वरीष्ठ सिस्टर निंफा परेरा व इतर मान्यवर उपस्थित होते.
सहशिक्षिका थेल्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स