साळशी येथील दिगंबर ऊर्फ भाऊ गांवकर यांचे निधन.
साळशीचे शिवसेना शाखाप्रमुख कैलास गांवकर यांचे ते वडिल होत…
शिरगांव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी-गांवकरवाडी येथील प्रतिष्ठीत रहिवाशी दिगंबर उर्फ भाऊ बापू गावकर(वय ७०) यांचे काल २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून,चुलत भाऊ,५ बहिणी,भावजयी,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. साळशी गांवचे शिवसेना शाखाप्रमुख कैलास गांवकर यांचे ते वडील होत.
श्री गांवकर यांच्या निधनाने साळशी परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)