पळसंब गावठणवाडी अंगणवाडी येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा.
चिंदर /विवेक परब : पळसंब गावठणवाडी अंगणवाडी येथे आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत केली. त्यावेळी अंगणवाडीतील मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली, तसेच अंगणवाडी सेविका कु. निकिता पुजारे, संगिता पळसंबकर यानी महिलांना किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले त्यावेळी ग्रामसेवक श्री. अमित कांबळी सदस्य श्री. एकनाथ चिंचवलकर सदस्या सौ. प्रणीता पुजारे, श्री . योगेश कापडी, मदतनिस सुनित्रा परब, अंजली गोलतकर, निकिता सावंत, सजना परब, कल्पना परब, धनश्री पुजारे, काव्या राऊत, तारा गोलतकर व अन्य पालक व मान्यवर उपस्थित होते.
[
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)