सुरांची डाॅन व लिटल चॅम्प गौरी गोसावीचा केला सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाजातर्फे सत्कार..!
महाविजेतेपदानंतर गौरी गोसावी प्रथमच मूळ गावी…!
चौके |अमोल गोसावी : प्रसिद्ध अशा झी मराठी वाहिनीवरील नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वाधिक लोकप्रिय सारेगमप लिटिल चॅंप स्पर्धेची महाविजेती ” सुरांची डॉन ” सिंधुदुर्ग कन्या कुमारी गौरी गोसावी ही स्पर्धेतील महाविजेतेपद पटकावल्यानंतर प्रथमच आज रविवारी सिंधुदुर्गात पडवे या आपल्या मूळ गावी दाखल झाली आहे.
गोसावी समाजाचा आणि मालवणीचा झेंडा अटकेपार फडकवून आपल्या गावी परतलेल्या गौरीचे अभिनंदन आणि सत्कार करण्यासाठी जिल्ह्यातून अनेकांनी आज सकाळपासूनच तिचे वास्तव्य असलेल्या ओरोस येथील श्री दिगंबर गोसावी यांच्या निवासस्थानी हजेरी लावली.
दरम्यान नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे, सिंधुदुर्ग या मंडळाने जिल्ह्यातील समस्त गोसावी समाजाच्यावतीने आज सकाळी सुरांची डॉन गौरी गोसावीचा यथोचित सत्कार केला आणि तिच्या यशाबद्दल कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री .विठ्ठल गोसावी, सचिव श्री. भालचंद्र गोसावी खजिनदार श्री. चंद्रसेन गोसावी , श्री. शरद गोसावी, श्री. संदिप गोसावी, श्री. राजेंद्र गोसावी, श्री. संजय गोसावी, श्री. उदय गोसावी, श्री. प्रशांत गोसावी श्री. किशोर गोसावी, श्री. नंदकिशोर गोसावी, श्री. मारूती गोसावी, श्री. दिगंबर गोसावी , श्री. रविंद्र गोसावी, श्री. सदा गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्कार स्विकारल्यानंतर गौरीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि , ” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या समाजाच्या वतीने म्हणजेच माझ्या कुटुंबाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद , महाविजेतेपदानंतर माझ्यावर संगीताची जबाबदारी वाढलेली आहे.”
संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवितानाच केमिकल इंजिनियरींग मध्ये पी एच डी करून गौरीचा प्रोफेसर व्हायचाही मानस असल्याचे तिने स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)