ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चिंदर गावच्या केशव घाडी यांची हिंदूह्रदयसम्राटांना अनोखी जयंती वंदना...!

चिंदर गावच्या केशव घाडी यांची हिंदूह्रदयसम्राटांना अनोखी जयंती वंदना...!

प्रकाशन: 24 Jan 2022 05:32 AM
वाचन संख्या 668

चिंदर / विवेक परब (विशेषवृत्त ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर गावचे सुपुत्र व सध्या मुंबईस्थीत असलेल्या श्री. केशव महादेव घाडी यांनी 14000 माचिस काड्यांपासून 3 फूट × 4 फूट आकाराचे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र बनवले.काल श्रीमान बाळासाहेबांच्या जयंतीचा योगायोग साधत दहिसर शाखा क्र. 5 शिवसेना नगरसेवक श्री संजय शंकर घाडी यांच्या हस्ते छायाचित्राचे अनावरण झाले यावेळी संजना घाडी, शाखाप्रमुख  सचिन शिर्के, विद्या पोतदार, संदिप शेलार, स्वामिल माने हे  उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक संजय घाडी यांनी शिवकेशव घाडी यांना कौतुकाची थाप देत त्यांची कला अशीच तेवत ठेवत उत्तरोत्तर नविन संकल्पना तयार करत रहायचे प्रोत्साहन दिले.  बाळासाहेबांच्या या छायाचित्रा बद्दल शिवकेशव यांचे आभारही मानले.


केशव हे लहानपणा पासून कला क्षेत्राची जाण आहे. आपल्या वडिलांची कला जोपासत ते गणपती रंगविणे, वाॅलपेटिंग, छायाचित्रे रेखाटणे असा प्रवास करत त्यांनी “जे. जे. स्कूल ऑफ आर्ट” मधून फाईन आर्ट व कमर्शिअल आर्ट पर्यंतचे शिक्षण घेतले. शिवकेशव यांच्या या छायाचित्राची सर्वत्र दखल घेतली जात असून सर्वच स्तरातून त्यांची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स