ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोरोना संसर्गाची व्याप्ती कमी असलेल्या विभागांतील शाळा होणार सोमवारपासून सुरु..!

कोरोना संसर्गाची व्याप्ती कमी असलेल्या विभागांतील शाळा होणार सोमवारपासून सुरु..!

प्रकाशन: 20 Jan 2022 08:41 PM
वाचन संख्या 72

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही शैक्षणिक संस्थांनी तसेच पालकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे त्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहे, असे सौ. गायकवाड म्हणाल्या. त्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक 24 जानेवारीपासून होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स