ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न.

मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न.

प्रकाशन: 20 Jan 2022 09:23 PM
वाचन संख्या 154

आमदार डाॅ.राजन साळवी यांनी केली होती मागणी..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्याचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मागणीनुसार मच्छीमार बांधवाच्या समस्या व मागण्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय मंत्री मा. ना. अस्लम शेख यांच्या दालनामध्ये आज दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०२.०० वा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाने केलेल्या पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्यामध्ये घातलेल्या अटी काही अंशी बदल होणेच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीमध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. अस्लम शेख यांना निवेदन देऊन मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागण्या निदर्शनास आणल्या. व सदर मागण्यामधील महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छिमारी करून येणाऱया पर्ससीन बोटींना बंदरात दळणवळण करायला व मासे उतरवायला सप्टेंबर ते मे महिन्याचा कालावधीत संविधानिक परवानगी देण्याबाबत विनंती करण्यात आली. आमदार साळवी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना.अस्लम शेख यांना निवेदन देऊन मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागण्या निदर्शनास आणल्या. व सदर मागण्यामधील महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छिमारी करून येणाऱया पर्ससीन बोटींना बंदरात ये-जा करायला व मासळी उतरायला माहे सप्टेंबर ते मेपर्यंत परवानगी देऊन भारताच्या संविधानात दिलेले मुलभूत अधिकार अबाधित ठेवणेबाबतविनंती केली. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. अस्लम शेख मच्छीमार बांधवाच्या समस्या व मागण्याचा विचार करता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मागवून निर्णय घेतला जाईल असे सूचित केले. व आमदार डॉ. राजन साळवी यांनी केल्या विनंतीला तत्व: मान्यता देऊन महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छिमारी करून येणाऱया पर्ससीन बोटींना बंदरात ये-जा करायला व मासळी उतरायला माहे सप्टेंबर ते मे पर्यंत परवानगी देण्याचे संबंधितांना सूचना दिल्या. या बैठकीस उपस्थिती आमदार डॉ. राजन साळवी, सेक्रेटरी जगदीश गुप्ता, आयुक्त मत्स्यव्यवसाय अतुल पाटणे, OSD मंत्री युवराज चौगुले, माजी आमदार खलिपे मॅडम (online), अविनाश लाड, सुरेश धानू, इम्रान मुकादम, कृष्णनाथ तांबे व मच्छिमार प्रतिनिधी इतर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स