डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेच्या कु मधुरा जगदीश पाटीलचे उल्लेखनीय यश
बांदा /राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडीअम स्कूल, बांदा प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले, प्राथमिक फेरीसाठी उत्तीर्ण झाल्यावर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्वितीय फेरीसाठी तिची निवड करण्यात आली आहे . संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी मधुराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)