युवासेना नाटळ व कळसुली विभागाचा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतला आढावा
🔸 युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती
आचरा / विवेक परब : युवासेना जि. प. नाटळ व कळसुली विभागाची आढावा बैठक नुकतीच युवासेना विस्तारक अमित पेडणेकर व जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याप्रसंगी जिल्हा बँक संचालक पदी निवडून आल्याबद्दल व युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुशांत नाईक यांचा विभागाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वयक गीतेश कडू, राजू राठोड, तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, कणकवली शहरप्रमुख तेजस राणे, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, प्रदीप सावंत, संकेत सुतार, सुमित सावंत, विराज कानडे, युवासेना शाखाप्रमुख प्रकाश बिले, चेतन गुरव, गौरव सावंत,समन्वयक उमेश गुरव, उपतालुकाप्रमुख सुशांत मोहिते, विभागप्रमुख रोहित राणे, उपविभागप्रमुख सूर्यकांत घाडीगावकर, रुपेश आमडोसकर, विजय घाडीगावकर, शरद सरंगले, अजित घाडीगांवकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)