ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नटसम्राटाचे स्वप्न गाव पूर्ण करणार जेष्ठ कलावंत कै. बी. के. तांबे यांच्या मनातील दशावतारी प्रयोग २० जानेवारी रोजी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नटसम्राटाचे स्वप्न गाव पूर्ण करणार जेष्ठ कलावंत कै. बी. के. तांबे यांच्या मनातील दशावतारी प्रयोग २० जानेवारी रोजी

प्रकाशन: 18 Jan 2022 11:36 AM
वाचन संख्या 145

कणकवली / उमेश परब : थोर दशावतारी कलावंत कै. बी, के, तांबे यांनी ज्या शाळेच्या रंगमंचावर ४० वर्षांपूर्वी नाटकाची सुरुवात केली. त्याच शाळेच्या रंगमंचावर आपलं शेवटचे नाटकं करणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे हे स्वप्न २० जानेवारीला पूर्ण होणार आहे. हळवल शाळा नंबर १ च्या बाजूला सायंकाळी ७ वाजता दशावतारी नाटकाचा प्रयोग होणार आहे. याला प्रयोगाला कोरोनाचे नियम पाळून दशावतार नाट्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बी.के. तांबे प्रेमी आणि हळवल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.आपल्या गावातील जनतेच्या प्रेमापोटी आणि सहकार्यामुळे आपण इथवर पोहचलो. त्या आपल्या गावच्या लोकांना मी काही देऊ शकत नाही. पण शेवटच्या नाटकात रंग लावून काम करून माझ्या गावाची लोकांची सेवा करायची आहे. अशी बी.के. तांबे यांची इच्छा होती. ती त्यांनी अनेक जणांना त्या अंतिम रात्री बोलून दाखवली होती. परंतु ती इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्यांनी दिलेली हाक हळवल वासियांनी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. कोरोना च्या महामारीमुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विलंब लागला. सर्वांच्या सहकार्यातुन श्री. तांबे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. कै. बी,के, तांबे यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. हळवलं गावचे नाव महाराष्ट्रच नव्हे तर देशभर गाजवले. त्यांचा एक सन्मान आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक दशावतारी नाटक २० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. हळवल शाळा नंबर 1 च्या बाजूला या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाचा हा बी के तांबे यांच्या स्वप्नपूर्तीचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. त्या वेळी हळवल गावातील ज्या ज्या दशावतारी कलाकारांनी आपले या कलेत योगदान दिले असे सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. बी के तांबे व दशावतार प्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोर पणे पाळून नाटक संपन्न होईल. अशी माहिती बीके तांबे प्रेमी व हळवल ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स