वायंगणी येथे संत दादा महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वायंगणी घाडीवाडी येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य दादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दादा महाराज दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दामोदर साळकर, प्रकाशक सिताराम (नाना) करमळकर, वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर, रुपेश अवसरे, सदानंद राणे, रामदास प्रभू , हनुमंत प्रभू, सुंदर प्रभू, चंद्रकांत कुबल, चंद्रकांत कावले, हरिश्चंद्र ढोलम, संदीप रेवणकर, चंदू वायंगणकर, सचिन रेडकर, आशितोष प्रभूचांदेकर, बाप्पा वायंगणकर, वायंगणी साई भजन मंडळाचे सर्व सदस्य, वायंगणी ग्रामस्थ, श्री संत दादा महाराज यांचे सर्व भक्त गण उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी दादा महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री संत दादा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी कोरोना नियमांचे पालन करून यावेळी संपन्न झाला. मंदिर जीर्णोद्धार पूर्णत्वास येत असून यासाठी विविध मान्यवरांचा हातभार लागलेला असून या सर्वांचे यावेळी दादा महाराज भक्त गण यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)