वडाचापाट येथे १९ रोजी मोफत आरोग्य तपासणी आणि महारक्तदान शिबिराचे आयोजन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वडाचापाट गावातील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीची यात्रा पौष पौर्णिमा अर्थात सोमवार १७ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. वडाचापाट ग्रामस्थांतर्फे यंदा कोरोना महामारीचे सावट असल्या कारणाने अगदी साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. १९ जानेवारी रोजी जत्राेत्सवा निमित्त एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे सिंधुदुर्ग तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कान, नाक, घसा आणि सर्व साधारण तपासणी, गुडघे दुखी वर मोफत तपासणी व मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)