ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांची ऐतिहासिक कामगिरी!

प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांची ऐतिहासिक कामगिरी!

प्रकाशन: 17 Jan 2022 02:31 PM
वाचन संख्या 67

पुणे येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

मसुरे| प्राजक्ता पेडणेकर : निगडी-पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 55 व्या सबज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथील 19 खेळाडूंनी मुंबई उपनगर संघाचे प्रतिनिधित्व करत 37 पदकांची कमाई केली.या स्पर्धेत मुलींच्या वयोगटात नीती दोशी, नेहा पास्ते, उर्वी परब, अनन्या तिर्लोटकर व अलिशा टाककर यांनी 12 वर्षा खालील सांघिक रौप्य पदक तसेच स्वाती मोहिते, मुद्रा झगडे, टियाना क्रास्टो व हर्षल घोलम यांनी 10 वर्षा खालील सांघिक कांस्य पदक प्रशिक्षक अचल रेवाळे व  विशाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावले. मुलांच्या 14 वर्षाखालील वयोगटात अध्यान देसाई याने वैयक्तिक 7 पदके जिंकत प्रथम, जश पारीख याने 5 पदके जिंकत द्वितीय क्रमांक शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केला. याच वयोगटात अमन देवाडिगा याने 2 व मन कोठारी याने सुद्धा 3 पदक कमावले. 12 वर्षाखालील वयोगटात वीर गाला, आश्रव वर्तक यांनी प्रत्येकी 2 पदके पटकावत तनिष पुरी याच्यासोबत सांघिक विजेतेपद जिंकले. 10 वर्षाखालील वयोगटात जीत चव्हाण 4 पदके जिंकत वैयक्तिक द्वितीय क्रमांक मिळविला, त्याच्याच जोडीला जय तहसीलदार आणि चिन्मय दुखांडे यांनी सांघिक विजेतेपद मिळविण्यासाठी मदत केली.प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे व मुंबई उपनगर मुलांच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक शैलेंद्र लाड यांनी मुलांच्या 10 , 12 व 14 या तिन्ही वयोगटात राज्यस्तरीय सांघिक अजिंक्यपद जिंकून देऊन इतिहास घडविला.या ऐतिहासिक कामगिरी बद्दल प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभागाच्या प्रमुख) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांसह संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या संघ परिवारावर सर्वत्र कौतुकाचा वर्षांव होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स