वाफोली आडावाडी रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी अन्यत्र वळवू नको
अशोक परब | बांदा : वाफोली आडावडी शेगडे घर ते संतोष परब यांचे घरी पर्यत त्या हेड खाली रस्त्याच्या मजबुतीकरण करणेसाठी मंजूर झालेला निधी त्याच रस्त्याच्या कामासाठी वापरा. निधी इतरत्र वळविल्यास जसाश तसे उत्तर दिले जाईल. या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची उत्तरे द्यावी लागतील असा गर्भित इशारा जेष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. अशोक परब यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात वाफोली आडावाडी येथील शेगडे यांचे घर ते संतोष परब यांचे घर येथे त्याच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण करण्यासाठी सन २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठी डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत निधी मंजूर आहे. मात्र गावातील अंतर्गत हालचाली पाहता मंजूर निधी हा ज्या रस्त्यासाठी मंजूर झाला आहे. तो त्याच रस्त्यावर खर्च होईल असे वाटत नाही.अधिकारी वर्गाला याची जाणीव नसेल परंतु आम्ही यासाठीच आपणास सावध करत आहोत. रस्ता मंजूर एकीकडे, व खर्च दुसऱ्याच रस्त्यावर असं झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. याला त्या खात्यांचे संबंधित अधिकारी जबाबदार असतील. ती सर्व जबाबदारी अधिकारी म्हणून आपलीच राहील. यासाठी पूर्ण खात्री करूनच काम हाती घ्या. अन्यथा याची उत्तरे द्यावी लागतील असे सूचक विधान त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जेष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)