त्रिंबक ग्रृप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकांत बागवे तर उपाध्यक्षपदी श्री रमेश परब
आचरा /विवेक परब : मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रृप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणूकीत शिवसेना प्रणित पँनलने एक हाती वर्चस्व राखले होते.
आज संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत श्री. श्रीकांत बागवे हे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून श्री. रमेश परब यांची एक मताने निवडण्यात आले यावेळी विभाग प्रमुख समिर लब्दे, संतोष तेली, चंद्रकांंत गोलतकर, संतोष गोरवले, एकनाथ चिंचवलकर, अनिल गांवकर, बाळू बाणे, राजू हिर्लेकर, सखाराम गोसावी, अवि परब, अशोक वाळवे हे उपस्थित होते व त्यांनी संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)