ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
प्राथमिक शिक्षक संघाकडून स्वराली मुणगेकरचे अभिनंदन

प्राथमिक शिक्षक संघाकडून स्वराली मुणगेकरचे अभिनंदन

प्रकाशन: 16 Jan 2022 02:57 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : चिपळूण तालक्यातील परांजपे मोतीवाले या विद्यालयातील स्वराली सतिश मुणगेकर या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून चिपळूण तालुका गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत ११६ वा क्रमांक मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गुहागरच्या वतीने शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला. देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री सतिश मुणगेकर हे चिपळूण येथे शिक्षक असून त्यांची कन्या कु. स्वराली हिने शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याने चिपळूण येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाध्यक्ष संतोष कदम व संघ शिलेदार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.कैलाश शार्दूल, शिक्षक पतपेढी संचालक सुनिल रामाणे, भारत गायकवाड, सुनिल नार्वेकर, श्री महेन्द्र रेडेकर, दिपक रेपाळ, श्री दिपक साबळे,नंदकुमार पवार, दिपक रामाणे, प्रदिप पवार,रविंद्र कुळ्ये,दिनेश जाक्कर, प्रमोद काजरोलकर,अशोक पाष्टे , रमाकांत पवार,आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स