सिंधुदिनांक
१६ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
१९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.
१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.१९७८: रु.
१,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा.
'द प्ले - मेकर वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ धिस गेम..!'
'द प्ले - मेकर वुईल डेफिनेटली राईज़ द स्टेट ऑफ ध...