ताज्या बातम्या
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी. स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा. नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!' सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम. प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान.
स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा.

स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा.

Article image

EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आनंद व गौरवाच्या भावना.


प्रकल्पाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याची दखल घेत MTDC कडून पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थितचे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण.


सिंधुदुर्ग | विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड झाली आहे. ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेशन/प्रॉडक्ट’ आणि ‘बेस्ट क्रिएटिव्ह/कॅम्पेन’ या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. 


भारतीय नौदलात ३८ वर्षे गौरवशाली सेवा बजावल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये निवृत्त झालेल्या ‘आयएनएस गुलदार’ या युद्धनौकेच्या माध्यमातून निवती रॉक्स परिसरात हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने सुमारे ४६.९१ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी नियंत्रित पद्धतीने स्थिर करून पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती विकसित करण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि पाण्याखालील पर्यटनाचा अनोखा अनुभव उपलब्ध करून देण्याबरोबरच सागरी जैवविविधतेच्या संवर्धनालाही या प्रकल्पातून चालना मिळणार आहे.


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य’ (SASCI) योजनेंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अहवालानुसार, प्रकल्प ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच्या दहा वर्षांत सुमारे ८०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील साहसी आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक व्यावसायिक, पर्यटन सेवा पुरवठादार आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’चा पुरस्कार वितरण सोहळा २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सहकार्याचीही दखल घेण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या नैसर्गिक सागरी संपदेला आधुनिक पर्यटन संकल्पनेची जोड देणारा ‘EX-INS गुलदार’ प्रकल्प कोकणच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.


ऐतिहासिक युद्धनौकेच्या अशा रोजगारक्षम तसेच पर्यटन वर्धनासाठी होत असलेल्या प्रतिष्ठेसह पुनर्वापराबाबत 'एक्स आयएनएस- गुलदार' च्या स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार व शानदारपणाची अनेक पर्यावरण व पर्यटन तज्ज्ञांकडूनही विशेष प्रशंसा करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय क...

21 Jul 2026 304

लोकप्रिय टॅग्स