परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा 20 जानेवारीपासून
कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरो चीफ)- योगियांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 118 वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार http://localhost/news/public/uploads/20 जानेवारी ते सोमवार 24 जानेवारी या कालावधीत कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे साजरा करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक विधी होणार आहेत. शासनाने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन करून अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा होणार आहे. http://localhost/news/public/uploads/20 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत पहाटे समाधी पूजन, सकाळी 8.30 ते 12.30 या वेळेत सर्व भक्तांच्या कल्याणार्थ ‘परमहंस भालचंद्र दत्तयाग’, 1 वा. नंतर भजने, रात्रौ 8 वा. दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत. गुरूवारी http://localhost/news/public/uploads/20 रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सोमवार 24 जानेवारी हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा 118 वा जन्मदिन असून त्यानिमित्त सकाळी समाधी पूजन, सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत समाधीस्थानी लघुरूद्र, दुपारी 11.30 ते 12.30 या वेळेत मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत बाबांचा जन्मोत्सव आणि नंतर भजने होणार आहेत. तर सायंकाळी 6 वा. मंदिर परिसरात भक्तगणांच्या मोजक्याच उपस्थितीत बाबांची पालखी मिरवणुक होणार आहे. तर रात्रौ दैनंदिन आरती होणार आहे. जन्मोत्सवात होणारे विविध धार्मिक विधी भाविकांना युट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. परमहंस भालचंद्र महाराज यांचा पाच दिवस साजरा होणारा जन्मोत्सव सोहळा शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी आणि या जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)