ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वडाचापाट सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा!

वडाचापाट सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा!

प्रकाशन: 15 Jan 2022 11:06 PM
वाचन संख्या 46

भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व १३ जागांवर मिळवला विजय

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वडाचापाट विकास सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षीक निवडणुकित भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. या निवडणुकीत १३ पैकी १३ जागांवर भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने विजय मिळविला आहे.
भाजप पुरस्कृत पॅनलचे प्रमुख आणि मालवणचे माजी सभापतीं राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कुत शेतकरी सहकार पॅनलने आपला विजय प्राप्त केला आहे. या शेतकरी सहकारी पॅनलचे उमेदवार राजेंद्र प्रभुदेसाई, एकनाथ पाटकर, महेंद्र हडकर, अभिमन्यु पालव, बाबुराव चिरमुले, प्रकाश चिरमुले, नामदेव वरक, स्मिता पालव, भानुदय कासले, श्रीनिवास हडकर, विजय घाडिगावकर, आंनदि पाटकर, विद्याधर तातोबा पाटकर यांनी विजय मिळवत शिवसेना पुरस्कुत पॅनलचा एकतर्फी पराभव केला.


या निवडणुकीत शिवसेना पुरस्कुत पॅनलचे प्रमुख तथा विद्यमान चेअरमन सतीश पालव यांच्यासहित सर्व उमेदवार पराभव झाले. या निवडणुकिसाठी भाजपच्या पॅनलला भाजप नेते दत्ता सामंत, अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अनिल कांदळकर, गोळवण सरपंच सुभाष लाड, साबाजी गावडे, सोमनाथ पानवलकर, रिता वायगंणकर, शरद मांजरेकर, विरेश पवार, बिजेंद्र गावडे, आप्पा घाडीगावकर यांनी सहकार्य केले.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. सर्व विजयी उमेदवाराचे भाजपचे अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसभापती राजु परूळेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मठबुद्रुक संस्थेचे चेअरमन अशोक कांदळकर यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स