अवघ्या विश्वाची आई.. शिरगावच्या श्री पावणाई देवीचा हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
शासनाच्या कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे भाविकांकडून काटेकोरपणे पालन
शिरगाव/संतोष साळसकर : सर्व माहेरवाशिणीच्या हाकेला धावणारी आणि असंख्य भक्तांच्या नवसाला पावणारी..अवघ्या विश्वाची आई…देवगड तालुक्यातील शिरगाव चे ग्रामदैवत श्री देवी पावणाई..चा वार्षिक हरिनाम सप्ताह कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.सर्व भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून देवीचे मनोभावे दर्शन घेतले.त्यामुळे हा वार्षिक उत्सव निर्विघनपणे पार पडला त्याबद्दल देवस्थान ट्रस्ट,बारा-पाच मानकरी,ग्रामस्थ यांनी सर्व भाविकांचे आभार मानले. या उत्सवाच्या दिवशी सकाळी देवीची पूजाअर्चा, हरिनाम घटस्थापना,त्यानंतर गावातील श्री पावणाई तावडेवाडी भजन मंडळ,श्री पावणाई आंबेखोल,श्री पावणाई चौकेवाडी,श्री पावणाई दुसनवाडी,श्री पावणाई उत्कर्ष भजन मंडळ-निमतवाडी,श्री पावणाई-बांदेश्वर,रामनगर,गिरावळदेवी,भुर्डी गांगेश्वर शिवभक्त भजन मंडळ आदी स्थानिक सुस्वर भजने पार पडली. दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत माहेरवाशियानी देवीच्या ओट्या भरल्या.दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनाने या उत्सवाची सांगता झाली.या उत्सवाला देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनीही भेट दिली. या उत्सवाला गावाबाहेरील दुकाने यांना बंदी होती.मंदिराच्या परिसरात सुरक्षित अंतर ठेवून भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. या मंदिराच्या दर्शनी भागात अयोध्या राममंदिराचा अप्रतिम देखावा सर भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.यावेळी मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्वधुत रोषणाई करण्यात आली होती.या उत्सवाला सर्व भाविकांनी कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून सहकार्य केल्याबद्दल देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश उर्फ नाना तावडे, इतर सर्व विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ यांनी येणाऱ्या भाविकांचे विशेष आभार मानले.अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)