ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे

प्रकाशन: 14 Jan 2022 03:20 PM
वाचन संख्या 184

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मोबाईल व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या

८० पेक्षा अधिक सेवा सुविधांची माहिती

२४ तास ही सुविधा उपलब्ध

मुंबई |प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

• मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा.

• गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील.

• आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस.

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

• आज अत्यंत आनंदाचा दिवस. मकर संक्रांतीत अपेक्षित असलेले संक्रमण आपण आज माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अत्यंत चांगल्या दिशेन करत आहोत ही आनंदाची बाब.

• इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास देतो.

• महाराष्ट्रासाठी, समाजासाठी खुप काही चांगलं करण्याचा प्रयत्न आज होत आहे.

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मनोगतातील मुद्दे

• महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, याचा विशेष आनंद

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणातील मुद्दे

• मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा

• कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते.

• मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर

डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या मनोगतातील मुद्दे

• आज अतिशय चांगला उपक्रम सुरु होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खुप मेहनत घेण्यात होती. आज या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होइल.

• नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद. देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका….

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स