ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चिंदर ग्रामपंचायत येथील ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

चिंदर ग्रामपंचायत येथील ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

प्रकाशन: 12 Jan 2022 04:44 PM
वाचन संख्या 205

आचरा /विवेक परब : चिंदर ग्रामपंचायत येथे गेले पाच वर्षे सहा महिने कार्यरत असलेले ग्रामविस्तार अधिकारी श्री प्रकाश गणपत कदम यांचा निरोप समारंभ ग्रामपंचायत चिंदरच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे यांंनी कदम यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कणकवली, घोणसरी, जानवली, कलमठ, रामगड, देवबाग असा ग्रामसेवक म्हणून प्रवास करत कदम हे चिंदर येथे ग्रामविस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचले. समयसुचकता, सयंमशिल, दुरदृष्टीचे असलेले कदम यांनी ग्रामपंचायतीसाठी विविधांगी उपक्रम राबवले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले. तर सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, भाजप तालुध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभारी विस्तार अधिकारी युवराज चव्हाण यांनी आपले विचार मांडले.

यावेळी आशा स्वंयसेवीका, महिला बचत गट, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, उद्योजक प्रकाश मेस्री, पोलिस पाटिल दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, देवेंद्र हडकर, माजी सरपंच घागरे, माजी उपसरपंच अनिल गांवकर, रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, आबा पवार, अजित पाडावे, बाबूराव कासले इ. उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स